ज्यांना बुद्ध समजून घ्यायचा असेल, त्यांनी ‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ हा ग्रंथ वाचणं, समजून-जाणून घेणं आवश्यक आहे
‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धान्त’ हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा, त्याच्या शिकवणीचा मूळ गाभा आहे. हा सिद्धान्त वस्तू, घटना यांचे मूळ स्वरूप समजून घेण्याचं सम्यक सूत्र आहे. मिळालेल्या मनुष्य जन्माचे काय करायला हवे, त्याचा विनियोग कसा करायला हवा, यासाठीची बुद्धांची धारणा म्हणजे हा सिद्धान्त. प्रतीत्यसमुत्पादात ‘आत्मा’ आणि ‘पुनर्जन्म’ या संकल्पनांना स्थान नाही, किंबहुना ‘अनात्मता’ हाच बुद्धविचाराचा पाया आहे.......